कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना योजनेसाठी जमीन खरेदी करणार; प्रस्ताव पाठविण्याचे शेतमालकांना आवाहन
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
योजनेसाठी जमीन खरेदी करणार;
प्रस्ताव पाठविण्याचे शेतमालकांना आवाहन
अकोला, दि. 6 :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान
योजनेच्या अनुषंगाने शेतजमीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाटी इच्छूक शेतमालकांनी
प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण सहायक आयुक्त एम. जी. वाठ यांनी
केले आहे.
सन 2025-26 करिता
ज्या शेतमालकांना आपल्या स्वत:च्या वैयक्तिक मालकीची शेतजमिन या योजनेअंतर्गत विक्री
करावयाची आहे, अशा शेतमालकांनी आपल्या शेतजमीन विक्रीसंबंधी प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयात
सादर करावेत. ई-क्लास, गावठाण जमीन, शासकीय जमीनीस ही योजना लागू नाही. शेतजमीनीवर
कोणताही बोजा नसावा. याबाबत अद्ययावत सातबारा व सद्य मूल्यांकनासह प्रथम कार्यालयात
संपर्क साधावा व विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातुन मिळवावा. त्याला आवश्यक सर्व कागदपत्रे
जोडून नंतर जमीन विक्रीचा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन श्री. वाठ यांनी केले.
जमीन विक्रीच्या
दरास जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजुरी देण्यात येईल व त्यानुसार जमिनीचे दर निश्चित
होतील. असे आवाहन सहाय्यक आयुक्त एम.जी.वाठ यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा