पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी घेतले श्री. राजराजेश्वराचे दर्शन कावड पालखी उत्सवात सहभाग

 











अकोला, दि १८ : राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज श्रावण सोमवारी  श्री
राजराजेश्वर कावड पालखी उत्सवानिमित्त अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शन घेत जलाभिषेक केला, तसेच कावड पालखी उत्सवात सहभागी होत मानाच्या श्री  राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पालखीचे पूजन केले.

यावेळी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अनेक मान्यवर, कावड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

८० वर्षापासून सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा कावड उत्सव अकोल्यात दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. हा लोकोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील नागरिक सहभागी  होतात.


स्वातंत्र्याची चळवळ ऐनभरात असताना या परंपरेचा जन्म झाला.अकोला शहराला भीषण पाणी टंचाईला समोर जाव लागलं होते. यावेळी काही युवकांनी पुढाकार घेऊन गांधीग्रामहून पुर्णा नदीचे जल आणून ग्रामदैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला होता. ही परंपरा अखंड सुरू आहे.

०००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा