राज्य मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोला जिल्ह्याला २३ पदके
राज्य मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोला जिल्ह्याला
२३ पदके
अकोला, दि. ५ : जळगाव येथे आयोजित महाराष्ट्र
राज्य मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्याने अकोला जिल्हा क्रीडा प्रबोधिनी व
अकोला शहर संघाच्या मुष्टियोद्ध्यांनी दमदार कामगिरी करत २३ पदके पटकावली. त्यात ८
सुवर्ण, ७ रजत व १० कांस्य पदकांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व
खेळाडूंचा गौरव करून अभिनंदन केले आहे. ज्यु. मुले, मुली वयोगटात क्रीडापीठ व अकोला
शहर संघामधून ३० ते ३३ कि. वजनगटात आदित्य सोनकांबळे, ३५ ते ३७ कि. वजनगटात संस्कार
आत्राम, ४३ ते ४६ कि. वजनगटात वेदांत पवार, ४० ते ४३ कि. वजनगटात कु. इशिका झांबरे,
७७ ते ७८ कि. वजनगटात कु. गार्गी राऊत, ५८ ते ६१ कि. वजनगटात कु. अक्षरा खंडारे व ७०+
कि. वजनगटात कु. वेदश्री गोतमारे यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.
त्याचप्रमाणे, ३७ ते ४० वजनगटात प्रेशित
गोगलिया, ४० ते ४३ वजनगटात जयेश कुंभार, ४९ ते ७२ वजनगटात विपुल चव्हाण यांनी रजत पदक
प्राप्त केले. तसेच ३७ ते ४० कि. वजनगटात क्रिश मकोरीया, ४६ ते ४९ कि. वजनगटात बख्तीयार
बहेरेवाले, ७०+ कि. वजनगटात स्वराज कांबळे व ४९ ते ७२ कि. वजनगटात कु. स्वराली वानखेडे
यांनी कांस्य पदक प्राप्त केले.
कॅडेट क्लास मुली वयोगटात २८ ते ३० कि.
वजनगटात कु. आराध्या कापरे, ३० ते ३२ कि. वजनगटात कु. अभिज्ञा इंगळे, ३२ ते ३४ कि.
वजनगटात कु. आराध्या बोरसे, ३६ ते ३८ कि. वजनगटात कु. सेलीना चव्हाण, ४८ ते ५०कि. वजनगटात
कु. त्रिशा पटके यांनी कांस्य पदक प्राप्त केले.
कब क्लास मुली वयोगटात क्रीडापीठ व अकोला
शहर संघामधून ३६ ते ३८ कि. वजनगटात कु. निहारीका गणवीर हिने सुवर्ण पदक प्राप्त केले
तसेच २२ कि. वजनगटात कु. रसिका झांबरे हिने रजत पदक प्राप्त केले तसेच २८ ते ३० कि.
वजनगटात कु. अवनी ठोसर हिने कांस्य पदक प्राप्त केले.
या यशाबद्दल जिल्हाधिकारी अजित कुंभार
यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सर्व विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. क्रीडा
विभाग सहायक संचालक सुधीर मोरे, क्रीडापीठ प्रमुख सुहास पाटील, उपसंचालक संजय सबनीस,
शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय बॉक्सींग कोच सतीशचंद्र भट्ट, सहायक
प्रशिक्षक आदित्य मने, योगेश निषाद, गजानन कबीर, सैयद साद, स्नेहा वनवे तसेच अकोला
चे जनप्रतिनिधी क्रीडाप्रेमी यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे
आश्वासन सर्व खेळाडुंना केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा