ई-पीक पाहणीसाठी पिकांची ॲपमध्ये नोंद करावी - जिल्हा प्रशासनाचे आवाहन
ई-पीक पाहणीसाठी पिकांची ॲपमध्ये नोंद करावी
-
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अकोला, दि. 21 : ई-पीक पाहणीसाठी शेतक-यांना डीसीएस मोबाईल अॅपद्वारे
सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी करता येते. या ॲपचे सुधारित
व्हर्जन (डीसीएस ॲप ४.०.०) आले असून, शेतक-यांनी ते आपल्या मोबाईलमध्ये अद्ययावत करून
घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ॲप गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार
काही तांत्रिक सुधारणा करून ते नवीन रूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे आता
यापुढे 100 टक्के ई-पीक पाहणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने
दिली.
पीक पाहणीत शेतक-यांनी स्वत: पिकांची या ॲपमध्ये नोंद करणे आवश्यक आहे.
त्याची मुदत दि. 14 सप्टेंबरपर्यंत आहे. शेतकरी बांधवांनी स्वतः पिकांची नोंद या अॅपद्वारे
करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणीची नोंद केली नाही, त्यांची कार्यवाही
तलाठ्यांमार्फत करण्यात येत होती. आता या प्रक्रियेतही बदल झाला आहे. आता ई-पीक पाहणी
करण्यासाठी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक गावासाठी एक सहायक उपलब्ध असेल.
त्यांच्याद्वारे ई-पीक पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होईल.
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद
इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई -पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपमध्ये नोंद असणे आवश्यक
राहणार आहे.
पीक पाहणी करण्यासाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आतील
पिकांचे दोन फोटो घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या ई- पीक पाहणी मदतीसाठी तसेच समस्या
सोडवण्यासाठी सहायक उपलब्ध राहतील. ई-पीक पाहणी नोंदणी केल्यास राज्य व केंद्र सरकारच्या
शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी खरीप 2025 ची पीक पाहणी शासनाने
दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन डीसीएस मोबाईल ॲपमध्ये
ई-पिक पाहणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार
व महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा