इमाव बहुजन कल्याण वसतिगृहात प्रवेश सुरू
इमाव बहुजन कल्याण वसतिगृहात प्रवेश सुरू
अकोला, दि. २१ : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे प्रत्येकी १००
क्षमतेच्या मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात
आली आहे.
विभागाचे मुलींसाठीचे वसतिगृह माधवनगर, संत तुकाराम चौकाजवळ, गोरक्षण
रस्ता येथे आहे. मुलांसाठीचे वसतिगृह शुभमंगल, बिर्ला रस्ता, तापडियानगर येथे आहे.
‘एचएमएएस.एमएएचएआयटी.ओआरजी’ या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त
जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक
शिक्षण घेणा-या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक डॉ. अनिता
राठोड यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई
फुले आधार योजना व पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शासकीय
वसतिगृहात ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य आहे, असेही डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा