जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी मुदतवाढ

 

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी मुदतवाढ 

अकोला, दि. ५ : पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत प्रवेशासाठी मुदत 13 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असून, 9 वी व 11 वीच्या रिक्त पदांसाठी दि. 23  सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, 11वी विज्ञान व वाणिज्य शाखेतील रिक्त जागांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

 

प्रवेशासाठी वाढलेल्या मुदतीचा उपयोग करुन उर्वरित वर्ग 5 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी विना विलंब ऑनलाईन पोर्टलव्दारे भरावे. विद्यार्थी सलग 3री ते 5वी मध्ये शिकत असावा. विद्यार्थी व पालक दोन्ही अकोला जिल्ह्याचेच रहिवासी असावेअर्ज करण्याची कोणतीही परीक्षा फी नाही. प्रवेश परिक्षा शनिवार दि. 13 डिसेंबर राहील.

इयत्ता 9 वी व 11वीतील रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज ‘सीबीएसईआयटीएमएस’ संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहेत. दि. 23 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरावा. परीक्षा 2026 मध्ये दि. 7 फेब्रुवारीला होईल. त्याचप्रमाणे, 11वी विज्ञान व वाणिज्य शाखेतील रिक्त जागांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. ते भरण्याची शेवटची तारीख दि. १० ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बाभूळगांव (जहों.) अकोला येथे किंवा 0724-2991087 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य कविता चव्हाण यांनी केले.

   

                                                          000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा