राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम

 


अकोला, दि . २७ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस दि.२९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत असून, विविध कार्यक्रम होणार आहेत.

राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचविणे, निरोगी राहण्याचा संदेश जावा, युवक व युवतींमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे. क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी विविध उपक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

दि. २९ ऑगस्ट सकाळी ७.३० वाजता राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उद्घाटन व खेळाडूंच्या रॅलीचे आयोजन, सकाळी ९ वाजता विविध खेळाचे प्रदर्शनीय सामने, सायंकाळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंचा सत्कार, दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजता मॅरेथॉन चे आयोजन, सकाळी ९.०० वाजता विविध खेळाचे प्रदर्शनीय सामने, सायंकाळी विद्यार्थी, खेळाडू, नागरिकांकरीता, मिशन ऑलिंपिक गेम गोल्ड अकोला महाराष्ट्रतर्फे खेळाडूंचा समतोल आहार या विषयावर व्याख्यान होणार आहे.

 दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता सायकल रॅली,  सकाळी ९ वाजता विविध खेळाचे प्रदर्शनीय सामने, सायंकाळी विद्यार्थी, खेळाडू, नागरिकांकरीता, शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळाचे महत्व, सीपीआर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
कार्यक्रमाकरिता अकोला जिल्ह्यातील खेळाडू, विद्यार्थी, क्रीडा मंडळे, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

सर्व शाळा, महावि‌द्यालये यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्ताने आपल्या शाळा व महावि‌द्यालयामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून वि‌द्यार्थी, खेळाडू यांना निरोगी राहण्याचा मूलमंत्र देणे आवश्यक आहे. यासाठी शाळा व महाविद्यालयांनी आपल्या शाळा व महावि‌द्यालयामध्ये खालील उपक्रम राबवावेत. दि. २९ ऑगस्टला उपक्रम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे, राष्ट्रीय क्रीडा दिनाची शपथ घेणे,   खेळाडूचा सन्मान व मार्गदर्शन, वि‌द्यार्थी, खेळाडुंकरीता मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करणे, लिंबुचमचा शर्यत, दोरीवरच्या
उड्या, रस्सीखेच, योगासन, क्रिकेट, आदी खेळ ३० ऑगस्ट विविध खेळाच्या स्पर्धांचे स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, यांच्या उपस्थितीमध्ये आयोजन करणे, (कबड्डी, खोखो, धावण्याची शर्यत), ३१ ऑगस्ट रोजी मॅरेथॉन दौड, सायकल रेस इत्यादी स्पर्धांचे आयोजन, क्रीडाविषयक बाबींवर चर्चासत्र आदी कार्यक्रम घ्यावेत. "प्रत्येक गल्ली, प्रत्येक मैदान, खेळेल सगळा हिंदुस्थान" अशी टॅगलाईन वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा