कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जिल्हा दौरा
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जिल्हा दौरा
अकोला, दि. 4 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे दि. 7 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
गुरूवार, दि. 7 ऑगस्ट रोजी शेगावहून स. 11 वा. बाळापूर विश्रामगृह येथे
आगमन व तहसूलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी
यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व चारा लागवड यासंबंधी चर्चा. आत्महत्याग्रस्त
शेतकरी कुटुंबियांना भेट, तद्नंतर चारा लागवडी ठिकाणास भेट व पाहणी.
दुपारी 1 वाजता पातूर जि. अकोलाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता पातूर
विश्रामगृह येथे आगमन व शेतकरी आत्महत्या व चारा लागवड यासंबंधी चर्चा व राखीव. दुपारी
3 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. तद्नंतर तहसिलदार पातूर यांनी निश्चित
केलेल्या प्रस्तावित चारा लागवडीचे ठिकाणास भेट व पाहणी. सायंकाळी 6 वाजता सोयीनुसार
अमरावती मार्गे काटोलकडे प्रयाण.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा