पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरूवारी दिव्यांगांना ‘जयपूर फूट’ वितरण जि. प. कर्मचारीभवनात होणार कार्यक्रम

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरूवारी दिव्यांगांना ‘जयपूर फूट’ वितरण

जि. प. कर्मचारीभवनात होणार कार्यक्रम

अकोला, दि. २० : लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना विनामूल्य कृत्रिम अवयव (जयपूर फूट) वितरण शिबिर उद्या, दि. २१ ऑगस्ट रोजी दु. ४ वा. जि. प. कर्मचारीभवन येथे होणार आहे.

पालकमंत्री ॲड. फुंडकर यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दु. ४ वा. अकोला येथे आगमन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या विनामूल्य कृत्रिम अवयव वाटप शिबिराला उपस्थिती, त्यानंतर अकोला येथून खामगावकडे प्रयाण. सायंकाळी ७ वा. खामगाव येथे आगमन व लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.

०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा