व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना
वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत
मुदत
अकोला, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जासाठी मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे.
अकोल्याचे रहिवाशी नसलेल्या परंतु अकोला
मनपा हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त
होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय
मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल एस. एस. लव्हाळे यांनी केले आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी लिंक
: https://hmas.mahait.org
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा