हिंगणा म्हैसपुर येथील स. नं. ३ मधील अतिक्रमण निष्कासित
अकोला, दि. 12 : हिंगणा म्हैसपुर येथील क्रीडा प्रबोधिनीच्या जागेवरील अतिक्रमण जिल्हा प्रशासनाकडून रीतसर कार्यवाहीद्वारे हटविण्यात आले आहे.
मौजे हिंगणा-म्हैसपुर येथील सर्व्हे नं.३ ही शासकीय जमीन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास क्रीडा प्रबोधिनीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रदान करण्यात आली. या जागेवर पुरूषोत्तम जयराम अहिर (रा. हिंगणा म्हैसपूर) यांच्याद्वारे अतिक्रमण करण्यात आले होते. हे अतिक्रमण आज रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनात, तसेच जिल्हा क्रीडा विभाग, महसुल विभाग, पोलीस विभाग, महानगरपालिका, जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज निष्कासित करण्यात आले. कारवाईनंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जिल्हा क्रीडा प्रबोधिनीबाबतचे फलक लावण्यात आले आहेत.
त्याठिकाणी अतिक्रमणधारक यांचे जयराम गोरक्षण ट्रस्टअंतर्गत असलेल्या गाईचे स्थलांतर आदर्श गोरक्षण संस्था, म्हैसपुर, वाशिम बायपास रोड याठिकाणी जिल्हा पशू वैद्यकीय अधिकारी व महानगरपालिका पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य पध्दतीने करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा