कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत
कृषी विभागाची जनजागृती मोहिम
जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
अकोला, दि. २५ : पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत
कृषी विभागामार्फत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत चित्ररथाचा
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ आज झाला.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी महेंद्र
साल्के आदी उपस्थित होते. फवारणीदरम्यान विषबाधा रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी
घ्यावी, याबाबत सहजसुलभ भाषेत शेतक-यांना माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी
यावेळी दिले.
फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती व कार्यवाहीबाबत बैठकीतही
सूचना देण्यात आल्या. कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक
आहे. यामध्ये हातमोजे, डोळ्यांसाठी चष्मा, तोंडावर मास्क आणि संपूर्ण शरीर झाकणारे
अॅप्रॉन यांचा समावेश आहे. ही साधने वापरल्यास कीटकनाशकांचा त्वचेशी थेट संपर्क टाळता
येतो.
शेतकऱ्यांनी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच फवारणी करावी. कडक
उन्हात फवारणी केल्यास विषबाधेचा धोका वाढतो. तसेच, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी
करू नये. सूचनांचे पालन कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी त्यावरील लेबल आणि
वापरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. सांगितलेल्या मात्रेतच कीटकनाशकाचा वापर
करावा. लहान मुलांना दूर ठेवा फवारणी चालू असताना लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना
शेतापासून दूर ठेवावे.
प्रथमोपचार
जर एखाद्या शेतकऱ्याला फवारणी करताना विषबाधेची लक्षणे (उदा. चक्कर
येणे, मळमळ होणे, जाणवली, तर त्यांनी तात्काळ फवारणी थांबवून जवळच्या आरोग्य केंद्रात
किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा. फवारणीच्या औषधाचे लेबल डॉक्टरांना दाखवावे,
स्वच्छतेची काळजी फवारणी पूर्ण झाल्यावर हात पाय आणि चेहरा साबणाने
स्वच्छ धुवावा. वापरलेली सुरक्षा साधनेही स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे
आवाहन जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिका-यांतर्फे करण्यात
आले.
०००
कलेक्टर वर्षा मीना ताई आप अकोला जिले की नए नियुक्त कलेक्टर हैं,,, इसलिए आप सब जानती है कि शराब अवैध कैसे हो रही है,, और अवैध शराब बंदी कानून व्यवस्था लागू होने के बाद भी तस्करो के पास शराब कौन पहुंचा रहा है,,फिर भी आप चुप हैं
उत्तर द्याहटवा