आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा मोबाईलने इ केवायसी करा, पाच लाखांचे कवच मिळवा

 

 

आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा

मोबाईलने इ केवायसी करा,

पाच लाखांचे कवच मिळवा

अकोला, दि.29 : आयुष्मान भारत, जनआरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अधिकाधिक गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी गावे, वस्त्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन केवायसी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात खासगी व शासकीय मिळून ४० रुग्णालयांत योजनेत सुविधा उपलब्ध असून, योजनेच्या अंमलबजावणीत अकोला जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.

या योजनेतून लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार व १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया सुविधा मिळणार आहेत. ई-केवायसी करून घेण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पुढाकार घेतला असून, ७ लक्ष ६० हजार ३५० कार्ड तयार झाले आहेत. लाभार्थ्यांची एकूण संख्या १७ लक्ष ३३ हजार १६ असून, उर्वरित ई- केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे.

 

योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे शिधापत्रिकाधारक पात्र आहेत. मात्र यासाठी आयुष्मान कार्ड तयार करून घेणे बंधनकारक आहे.

लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर देखील आयुष्मान अॅप डाऊनलोड करून इ केवायसी करू शकतात. आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या कार्डधारकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा आहे त्याकरिता आयुष्यमान कार्ड काढणे गरजेचे आहे ज्याच्याकडे अजूनही कार्ड नाही त्यांनी व ज्यांची ही केवायसी बाकी आहे त्यांनी त्वरित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, योजनेच्या जिल्हा समन्वयक आदींनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा