मतदार नोंदणीसाठी सर्व मतदान केंद्रांवर चार शिबिरे पाचही विधानसभा मतदारसंघात दि. ३, ४, १० व ११ ऑक्‍टोबरला शिबिरे

 

 मतदार नोंदणीसाठी सर्व मतदान केंद्रांवर चार शिबिरे

                       पाचही विधानसभा मतदारसंघात

                   दि. ३, ४, १० व ११ ऑक्‍टोबरला शिबिरे

 

                अकोला, दि. ३० : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलेले आहे.त्‍यानुसार दावे व हरकती सादर करण्‍यासाठी दि. ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर अशी मुदतवाढ दिेलेली असून, अंतिम मतदार यादी दि.१६.११.२०२६ रोजी प्रसिध्‍द होईल.

निवडणूक आयोगाने दावे व हरकती सादर करण्‍यासाठी देण्‍यात आलेली दिनांक १२ ऑक्टोबरची मुदतवाढ विचारात घेऊन, जास्‍तीत जास्‍त नागरीकांना/नव मतदारांना आपली नावे मतदार यादी मध्‍ये नोंदविण्‍याची सुविधा उपलब्‍ध झालेली आहे.

        विशेष सखोल पुनरिक्षणाच्या दावे व हरकती कालावधीत अकोला जिल्ह्यातील सर्व ५ ही विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ३, ४, १० व ११ ऑक्‍टोबर, या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीत उपस्थित राहणार असून त्यांच्याकडे नवमतदार/ अन्यथा पात्र असून प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीमध्ये अस्तित्वात असलेल्या नोंदींमध्ये सुधारणा करणे, तसेच यादीतील नावाच्या वगळणी संदर्भात आक्षेप दाखल करणे आदी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही करता येईल.

विशेष शिबिरांमध्ये महिला तसेच दिव्यांगांच्या समावेशनासाठी विशेष प्राधान्य असेल. जिल्हयातील दिनांक ०१.१०.२०२६ रोजी किंवा त्‍यापूर्वी वयाची १८ वर्ष पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्यथा पात्र असून प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी वरील दिनांकास आयोजित विशेष शिबिरा मध्‍ये अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन