रोजगार महाकुंभ : कौशल्य विकास, रोजगार विभागाचा भव्य उपक्रम जिल्ह्यात एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार मेळावे; शेकडो पदांची भरती
रोजगार महाकुंभ : कौशल्य विकास, रोजगार
विभागाचा भव्य उपक्रम
जिल्ह्यात एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार
मेळावे; शेकडो पदांची भरती
अकोला, दि. ८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे ‘रोजगार महाकुंभ
– महाराष्ट्र’ दि. २९ सप्टेंबरला होणार असून, जिल्ह्यात
एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांबरोबरच
स्थानिक उद्योगांच्या समावेशासह होणा-या या मेळाव्यांमध्ये शेकडो पदांची भरती होणार
आहे.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की, नोंदणी करणाऱ्या उमेदवारांचे पूर्व प्रशिक्षण, व
मुलाखतीची तयारी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेमार्फत करून घेण्यात येणार आहे. अकोला येथे अकोला इंडस्ट्री असोसिएशन हॉल,(औद्योगिक वसाहत), शंकरलाल
खंडेलवाल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, गौरक्षण रस्त्यावरील दि प्रोफेशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे मेळावा होईल.
त्याचप्रमाणे, मूर्तिजापूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातूर तालुक्यातील आलेगाव येथे रसिकलालजी धारीवाल खाजगी औ.प्र.संस्था, पातूर येथे डॉ.
एच. एन. सिन्हा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, व्याळा
येथील मानव स्कूल ऑफ
पॉलिटेक्निकमध्ये, बार्शिटाकळी तालुक्यात कान्हेरी येथील श्रीमती
कमलाबाई देशमुख खाजगी औ.प्र.संस्था, अकोट येथील श्री शिवाजी
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट,
तसेच तेल्हारा येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात मेळावा
होणार आहे.
राज्यव्यापी रोजगार मेळावे /
प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी
अर्जात आवश्यक माहिती अचूकपणे भरावी.
नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
अशी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र,
प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय
परिसर, अकोला येथे किंवा
9130419585, 9767852758, 9545000093 या भ्रमणध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा. अकोला जिल्ह्यातून अधिकाधिक तरूणांनी या संधीचा लाभ घेण्याचे
आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा