भव्य कावड व पालखी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल
भव्य कावड व पालखी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल
६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ते ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात ही वाहतूक वळवण्यात आली आहे.
## 🚗 प्रमुख पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
* अकोला ते अकोट मार्ग: अकोला बस स्थानक - पोस्ट ऑफिस चौक - अशोक वाटिका चौक - जेल चौक - पत्रकार चौक - वाशिम बायपास - शेगाव टी पॉईंट - गायगाव - निंवा फाटा - देवरी मार्गे अकोट (दोन्ही बाजूंची वाहतूक).
* अकोला ते दर्यापूर मार्ग: अकोला बस स्थानक - अग्रसेन चौक - दुर्गा चौक - जेठारपेठ चौक - लहान उमरी - मोठी उमरी - गुडधी - रेल्वे गेट - आदिलाबाद मार्गे घुसर - म्हैसांग मार्गे दर्यापूर.
* मूर्तिजापूर ते दर्यापूर मार्ग: दर्यापूर रोडवरील टोल नाका - मूर्तिजापूर - हिरपूर - बोर्टा - आसरा फाटा - अमरावती रोडने दर्यापूर.
शहरांतर्गत वाहतूक बदल:
रेल्वे स्टेशन चौक, नवीन बस स्थानक, डाबकी रोड आणि लक्झरी बस स्थानक परिसरातून जाणाऱ्या वाहनांना नवीन उड्डाणपुल, जेल चौक, वाशिम बायपास चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी आणि वाहनधारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा