लोकसंवाद उपक्रमातून स्वयंरोजगार योजनांची माहिती ; तरुणांनी स्वयंरोजगारासाठी पुढे यावे- अधिकाऱ्यांचे आवाहन ; जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रम
लोकसंवाद उपक्रमातून स्वयंरोजगार योजनांची माहिती
तरुणांनी स्वयंरोजगारासाठी पुढे यावे- अधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रम
अकोला, दि. २१ : स्वयंरोजगाराचा मार्ग उन्नतीकडे नेणारा असून राज्य शासनाने अनेक लाभदायी योजना सुरू केल्या अधिकाधिक तरुणांनी त्यांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराची वाटचाल करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाची प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी आज येथे केले.
लोकसंवाद अभियान अंतर्गत अकोला तालुक्यातील शिवापूर गावातील जय भवानी व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळांपुढे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत युवक - युवतींनी रोजगारक्षम बनण्यासाठी, उद्योग उभारण्यासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांविषयी
मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सेवा संकल्प अभियान व ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
सेवा संकल्प अभियानात जिल्ह्यात ठिकठिकाणी शासकीय योजनांची जनजागृती कार्यक्रम होत आहेत. त्यानुसार उद्योग विभागांतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती गावातील नागरिकांना दिली.
यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, भक्तगण तसेच गावातील नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा