काटेपूर्णा सभागृहात बचत योजनांविषयी शिबिर
काटेपूर्णा सभागृहात बचत योजनांविषयी
शिबिर
अकोला, दि. २४ : भारतीय टपाल सेवा
विभागामार्फत कर्मचा-यांसाठी बचत, कर्ज सुविधा, विमा योजना याविषयी माहिती व मार्गदर्शन
करण्यासाठी शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयात काटेपूर्णा सभागृहात दि. ३० सप्टेंबरला सायं.
५ वा. होणार आहे. या योजनांच्या माध्यमातून भविष्य सुखकर करण्यासाठी अधिकाधिक कर्मचा-यांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी केले.
००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा