आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा आढावा आयुष्मान कार्डच्या संपूर्ण नोंदणीसाठी सर्वंकष प्रयत्न करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना


आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा आढावा

आयुष्मान कार्डच्या संपूर्ण नोंदणीसाठी सर्वंकष प्रयत्न करा

-        जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत अकोला जिल्ह्यात ५३ टक्के नोंदणी  झाली असून, जिल्ह्याचा राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये समावेश आहे. नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी ही योजना महत्वपूर्ण असून, १०० टक्के नोंदणी होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

 

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण व तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, माता व बालसंगोपन अधिकारी विनोद करंजीकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण बाहेती, योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. शीतल गावंडे, डॉ. पंकज बोरकर, तसेच योजनेत अंगीकृत रूग्णालयांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

 

जिल्ह्यात योजनेचे १७ लाख ३३ हजार पात्र लाभार्थी आहेत. तथापि, ९ लाख २१ हजार ८७५ व्यक्तींची ई-केवायसी झाली आहे. अकोला जिल्ह्यात ५३ टक्के नोंदणी  झाली असून, जिल्ह्याचा राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात ४० खासगी व ४० शासकीय रूग्णालये योजनेत अंगीकृत आहेत. या बैठकीत पीएम राहत या रस्ते अपघात मदत योजनेबाबतही चर्चा झाली. एखाद्या रस्ते अपघातात सापडलेल्या व्यक्तीचे आयुष्मान कार्ड नसल्यासही त्याला पीएम राहत योजनेत अंगीकृत रूग्णालयात दीड लाख रू. पर्यंत विनामूल्य उपचार मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेत अंगीकृत सर्व रूग्णालयांमध्ये पीएम राहत योजनाही लागू आहे. त्याची माहिती सर्वदूर पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

बैठकीत योजनेचा गत तीन महिन्यात आढावा घेण्यात आला. प्राप्त तक्रारींवर चर्चा झाली. त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

आयुष्मान कार्डची निर्मिती व रूग्णालयाला काम करताना येणा-या अडचणीही यावेळी जाणून घेण्यात आल्या.

०००

 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन