सोन तारण गहाण करारावर योग्य मुद्रांक अदा करावे - मुद्रांक जिल्हाधिकारी

 सोन तारण गहाण करारावर योग्य मुद्रांक अदा करावे


- मुद्रांक जिल्हाधिकारी


अकोला - सोने तारण ठेऊन गहाणखताचे जे दस्त ऐवज बँकांमार्फत केले जातात त्यावर निर्धारीत केलेल्या दराने मुद्रांक शुल्काची आकारणी करावी व शासनाचा महसुल अदा करावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. संजय चव्हाण यांनी आज रोजी आयोजित केलेल्या बँक प्रतिनिधींच्या सभेमध्ये केले.


सोने तारण गहाण करारावर रु. 5 लक्ष कर्ज रक्कमे पर्यंत 0.1% टक्के व 5 लाख पेक्षा जास्त रक्कमे करीता 0.3% टक्के (कमाल रक्कम 20 लाख) या दराने प्रत्येक दस्तऐवजांवर मुद्रांकांची आकारणी करावी जेणेकरुन शासनाचा महसुल वसुल होईल व त्याचप्रमाणे बँकांचे हक्क संराक्षित होतील आणि दस्त कायदेशीर रितीने केले जातील असे ही त्यांनी सांगीतले. या सभेत सोनेतारण गहाण दस्तावरील मुद्रांकाच्या आकारणी बाबतच्या विषयाचे सादरी करण सह जिल्हा निबंधक तथा प्रशासकीय अधिकारी श्री. धनंजय देशपांडे यांनी केले. सोने गहाण दस्तांवरील मुद्रांक शुल्काचा आढावा मुद्रांक जिल्हाधिकारी श्री संजय चव्हाण हे प्रत्यक्ष भेटी देवुन तपासणी करुन घेणार आहेत असेही यावेळी सुचित करण्यात आले.


सदर सभा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मुख्य कार्यालयात मुद्रांक जिल्हाकारी यांचे दालनात आयोजीत करण्यात आली होती. प्रस्तुत सभेच्या यशस्वितेकरीता नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


सदर सभे करिता अकोला स्थित विविध बँकांचे अधिकारी तथा प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन