शिवार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; अद्ययावत तंत्र व संशोधनाचा शेतक-यांना लाभ करून द्यावा - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
शिवार फेरीचा उत्साहात शुभारंभ
अद्ययावत तंत्र व संशोधनाचा शेतक-यांना लाभ करून द्यावा
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
अकोला, दि. २० : शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यासाठी उत्पादनखर्चात घट होऊन उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तेथील स्थिती व अडचणी समजवून घ्याव्यात व अद्ययावत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे शिवार फेरी व चर्चा सत्राचे उद्घाटन कृषिमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, कृषी सचिव परिमल सिंह, कुलगुरू डॉ शरद गडाख, माजी आमदार अमोल मिटकरी, रामेश्वर ठाकरे, संचालक विस्तार शिक्षण तथा आयोजक डॉ. धनराज उंदीरवाडे आदी उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले की, कृषी विद्यापीठातर्फे आयोजित शिवार फेरी शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक आहे. येथील विविध पीकांची प्रात्यक्षिके, प्रयोग महत्वपूर्ण आहेत. हे सर्वत्र पोहोचले पाहिजे. शेतीत त्याचा वापर वाढावा. त्यासाठी बांधापर्यंत हे तंत्र व संशोधन पोहोचावे. शेतीपूरक उद्योगांची वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्र कृषी उद्योजकता विकास महामंडळाच्या (नोगा) नागपूर येथील युनिटचे ऑनलाईन लोकार्पण मंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, तसेच ‘’मॉडेल व्हिलेज’बाबत ग्रंथ, विविध माहितीपत्रके व इतर प्रकाशनांचे प्रकाशन यावेळी झाले.
विदर्भासह राज्यातील सर्वच विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या तीन दिवसीय शिवार फेरीचा लाभ घ्यावा व येणारा हंगाम यशस्वी करावा असे आवाहन कुलगुरू डॉ. गडाख यांनी केले.
%20-%20Copy.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा