लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती *जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमास चांगला प्रतिसाद* *वैद्यकीय उपचार व सेवा-सुविधांची दिली माहिती*

 





लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती

*जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमास चांगला प्रतिसाद*

*वैद्यकीय उपचार व सेवा-सुविधांची दिली माहिती*

अकोला, दि. २३ : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमातर्गंत शहरातील लाल बागचा राजा गणेशोत्सव मंडळापुढे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आरोग्य समन्वयक बाळासाहेब घुगे यांनी आरोग्य विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना तसेच वैद्यकीय सेवा-सुविधांची सविस्तर माहिती आज दिली.

गणेशोत्सवाच्या औचित्यप्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान लोकसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे.


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे ग्रामीण भागात पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य योजनांची व सेवा सुविधांची सविस्तर माहिती श्री. घुगे यांनी उपस्थित भक्तगण, नागरिकांना दिली. या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

राज्य शासनाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून सर्व प्रकारच्या हृदयरोग, कॅन्सर, क्षयरोग आदी दुर्धर आजारावर शस्त्रक्रिया, उपचार करण्यासाठी पाच लाखापर्यंतची वैद्यकीय मदत देण्यात येते.
बाल्यावस्था पासून
तर वयोवृद्ध होण्यापर्यंत सर्व टप्प्यांवर प्रत्येक नागरिकाला राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार व सेवा पुरविल्या जातात.

HPV (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) लस ही प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि इतर काही कर्करोगांपासून संरक्षण करणारी अत्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक लस आहे, याबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

जिल्हा परिषद प्रशासनांतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र याठिकाणी लहान मुला-मुलींना पोषण आहार गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार, प्रत्येक टप्प्यावर लसीकरण तसेच तातडीच्या प्रसंगी प्रथमोपचार, वैद्यकीय उपचार, रुग्णवाहिका आदी सेवा सुविधा पुरविल्या जाते. कुठलाही अपघात किंवा ग्रामीण ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी 102 व 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली जाते. या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. घुगे यांनी यावेळी केले.


लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ऍड. मोतीसिंग मोहता, राजेश चंदनबटवे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन