रविवारपासून कृषि विद्यापीठात खरीप शिवार फेरी! कृषि मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते संपन्न होणार उदघाटन!

 रविवारपासून कृषि विद्यापीठात खरीप शिवार फेरी!


कृषि मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते संपन्न होणार उदघाटन!


विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे आयोजित तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे प्रतिकूलपती मा. ना.दत्तात्रय भरणे यांचे  शुभहस्ते रविवार दिनांक 20 सप्टेबर 2026 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. ॲड. आकाश फुंडकर यांचे अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या  उद्घाटन सत्राचे प्रसंगी, महाराष्ट्र राज्याचे कृषि राज्यमंत्री मा.ना.ॲड. आशिष जयस्वाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळ पक्ष मुख्य प्रतोद (मंत्री दर्जा) मा.आ. रणधीर सावरकर, अकोला शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. शारदा खेडकर, अकोला जिल्ह्याचे युवा खासदार मा.अनुप धोत्रे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे उपाध्यक्ष मा. तुषार पवार, महाराष्ट्र राज्याचे कृषि सचिव मा. परिमल सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू मा.कर्नल प्रा.(डॉ). शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणी, बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू मा.डॉ.संजय भावे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू मा.डॉ.विलास खर्चे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू मा.डॉ.नितीन पाटील, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या कृषि विस्तार शाखेचे उपमहासंचालक मा.डॉ.राजवीर सिंग, सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.  या उद्घाटन प्रसंगी विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. ॲड.श्री किरण सरनाईक,विधान परिषद सदस्य मा. आ. वसंत खंडेलवाल, विधान परिषद सदस्य मा. आ. धीरज लिंगाडे, जेष्ठ विधानसभा सदस्य मा.आ. प्रकाश भारसाकळे,  विधानसभा सदस्य मा. आ. हरीश पिंपळे, विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा.आ. अमित झनक, विधानसभा सदस्य मा.आ. नितीन देशमुख, विधानसभा सदस्य  मा.आ. साजिद खान पठाण, महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त मा.श्री.सुरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे, चे महासंचालक मा.श्री. राहुल माहिवाल, कृषि प्राद्योगिकी अनुप्रयोग अनुसंधान संस्था (अटारी) पुणेचे महासंचालक मा.डॉ.सुब्रतो रॉय, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य सर्वश्री मा. रामेश्वर ठाकरे, मा. शिवराम घोडके, मा. डॉ. एन जी पाटील, जिल्हाधिकारी अकोला मा. श्रीमती वर्षा मीना , जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनय नावंदर, जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक तथा महाराष्ट्र बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. दिलीप स्वामी, विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.

 तीन दिवसीय शिवार फेरीत संपूर्ण विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींना निमंत्रित केले असून अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींना शिवार फेरीत सहभागी होण्याचे दृष्टीने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे पार्श्वभूमीवर महिला शेतकरी वर्गाला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी केले आहे.

...........................................

 यंदाचे शिवार फेरीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसह राज्य शासनाचा कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा, महाबीज, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), रिलायन्स फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, जिल्हा परिषद उमेद अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ आदींचा सहभाग असणार आहे.

,..........................................

 शिवार फेरीसाठी जिल्हानिहाय कार्यक्रम 

* 20 सप्टेंबर रविवार - अकोला, वाशिम, बुलढाणा आणि गोंदिया जिल्हा  

* 21 सप्टेंबर सोमवार -वर्धा, नागपूर आणि गडचिरोली जिल्हा तथा

* 22 सप्टेंबर मंगळवार-अमरावती, यवतमाळ, भंडारा, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनी आणि विद्यार्थी शिवार फेरीला भेटी देणार आहेत. तथापि कोणीही कधीही शिवार फेरीत सहभागी होऊ शकतो याची सुद्धा कृपया नोंद घ्यावी .

,...........................................


सन 1982 पासून शिवार फेरी हा विस्तार कार्यक्रम विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात येतो या निमित्ताने विद्यापीठ निर्मित पिकवाण तथा संशोधन शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष पहावे हा आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे. गतवर्षी विदर्भातील 11 जिल्ह्यामधून एक लक्ष पेक्षा जास्त शेतकरी बंधू-भगिनींनी शिवार फेरीला भेट देत विद्यापीठ प्रक्षेत्रावर विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघितले व त्याचा आपल्या शेतीमध्ये नक्कीच उपयोग केला असेल.

शिवार फेरीला येणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींच्या सेवेकरीता गतवर्षीपासून स्वयंसहायता बचत गटांना अल्पपोहार, चहापान व भोजन व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिशय अत्यल्प दरात बचत गट सदस्य आपल्या सेवा पुरवित आहेत.


शिवार फेरीसाठी नोंदणी केलेल्या शेतकरी बंधू -भगिनींना विद्यापीठ प्रक्षेत्रावर शिवार फेरी केले जाते व दुपारचे सत्राचे चर्चासत्राचे माध्यमातून शेतकरी बंधू-भगिनी आपल्या शेतीविषयक शंकांचे निरसन करून घेतात.

...........................................

* शिवारफेरीचे खास वैशिष्ट्यांमध्ये 25 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी 228 विविध पिक वाण, 15 तंत्रज्ञान शिफारशीसह थेट पीक प्रात्यक्षिके प्रत्येकी पहावयास मिळणार आहे.

* तसेच दरवर्षीप्रमाणे विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे 3200 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे सोबतच 02 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांचे पैदास कार बियाणे बिजोत्पादन कार्यक्रम पाहावयास मिळणार आहे. 

* शिवार फेरीचे उद्घाटनानंतर रब्बी हंगामा करता बियाण्यांची विक्री सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.

...........................................

•  जिवंत पिक प्रात्यक्षिके प्रक्षेत्रावर पंचवीस एकर क्षेत्रावर

* 110 खरीप पीके

* 27 भाजीपाला पिके

* 65 फुलवर्गीय पिके तथा

* 15 लागवड तंत्रज्ञान शिफारशी

* असे एकूण 228 पिकवाण तथा तंत्रज्ञान शिफारसी एकाच ठिकाणी पाहावयास मिळणार आहे.

* यामध्ये तृणधान्याचे एकूण 32 वाण

* कडधान्य 23 वा तेलबिया 31 वाण

* कापूस 24 वाण

* चारा पिके 11 वाण

* भाजीपाला पिके 27 वाण 

* फुलपिके 65 वाण  

* यांसह तंत्रज्ञान शिफारसी 15 

* खरीप शिवार फेरीचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचीच नव्हे तर आपल्या राज्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी,बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी सोबतच महाबीजसह एकूण 14 खाजगी कंपन्यांचे देखील प्रात्यक्षिके प्रत्यक्ष अवलोकनासाठी उपलब्ध करून दिली आहेत.

* मुळात यामागील उद्देश शेतकरी बंधूंना सर्व प्रकारचे लागवड तंत्रज्ञान व विविध पीक वाणांचे प्रत्यक्ष अवलोकन करता यावे व आपले गरजेनुसार सोयीनुसार त्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा.

* थेट पीक प्रात्यक्षिके शिवारफेरीचा एक भाग असून दरवर्षीप्रमाणे इतर 20 हूनही प्रक्षेत्र / विभागासह शेतकरी बांधवांना विद्यापीठाचे संपूर्ण प्रक्षेत्र पाहण्याकरता उपलब्ध राहणार आहे. 

* अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी यंदा शिवार फेरीत सहभागी होऊन बदलत्या जागतिक हवामानाच्या परिस्थितीत आपली शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील कालसुसंगत बदल याची' देही याची डोळा बघून त्याचा अवलंब आपल्या शेतात कसा करता येईल याबाबत शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्या विद्यापीठाच्या या प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन विद्यापीठ परिवाराकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन