लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर ; पोलीस विभागाकडून सायबर सुरक्षा, बालकांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन ; जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

 लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर 


पोलीस विभागाकडून सायबर सुरक्षा, बालकांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन  


जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम 


112, 1098, 1930 हेल्पलाईन क्रमांकाचे महत्व विषद


अकोला, दि. २२ : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकसंवाद- २०२६ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज शहरातील खडकीचा महाराजा गणेशोत्सव मंडळापुढे सायबर सुरक्षा, महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस हवलदार गोपाल मुकूंदे यांनी उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून राज्यभरात दि १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान लोकसंवादाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. 


खोटे आमीष दाखवून व आकर्षक योजनेतून पैसे कमविण्याची संधी, अनोळखी व्यक्तींसोबत गेमींग आदी व्दारे लोकांना डीजीटल अरेस्ट केल्या जाते. सायबर फ्रॉड कशा पध्दतीने केला जातो, सामान्य माणसे त्याची कशी बळी पडतात, यासंदर्भात श्री. मुकूंदे यांनी उदाहरणासह मार्गदर्शन केले तसेच बँक खात्यातून पैसे गायब झाले तर, तत्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. पोलीस विभागाच्या 1930 या सायबर सुरक्षा हेल्पलाईन वर संपर्क करावा, असे त्यांनी सांगितले.


लहान मुला-मुलींनी ओळखीची किंवा अनोळखी व्यक्तीने कुठल्याही गुड टच व बॅड टच याबाबत तत्काळ आपल्या आई बाबांना कळवावे. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरुन त्यांच्यासोबत कुठेही जावू नये  किं वा काहीही खावू नये. एखादयाने बळजबरी केली तर जोरजोराने ओरडून बचाव करावा, सुर क्षि त ठि काणी लपून जावे. आपल्या परिसरात एखादया लहान मुला-मुलींसोबत असे घडताना दि सले किंवा काही विचीत्र वाटले तर तत्काळ पोलीस  विभागाच्या 112 या क्रमांकावर तसेच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 तत्काळ संपर्क साधावा. बचाव टीम लवकरच त्या ठिकाणी पोहोचते, अशी उपाययोजनेबाबतची माहिती श्री. मुकूंदे यांनी यावेळी दिली.


गणेश मंडळाचे पदाधिकारी आशुतोष चव्हाण तसेच सदस्य यांच्यासह जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधि कारी भगवंत अनवाने, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहीती अधिकारी विजय राऊत तसेच परिसरातील महिला, पुरुष, लहान मुले, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.

                                                                                                                                                                                                                                                                                 00000























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन