जिल्हाधिकाऱ्यांकडून अकोला तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी प्राथमिक पाहणी अहवाल तत्काळ सादर करा- जिल्हाधिकारी वर्षा मीना
जिल्हाधिकाऱ्यांकडून अकोला तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी
प्राथमिक पाहणी अहवाल तत्काळ सादर करा- जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. ३ सप्टेंबर : जिल्ह्यात मागील 25 ते 30 दिवसापासून पावसात खंड पडल्याने काही ठिकाणी पीकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज अकोला तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेता, प्राथमिक पाहणी अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महसूल व कृषी यंत्रणांना दिले.
ई पीक पाहणी संदर्भात सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. ई पीक पाहणी बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित तलाठी व कृषी सहायकांना दिले.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी प्रथम बोरगाव खुर्द गावातील नुकसान ग्रस्त सोयाबीन पीक क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर डाबकी जहागीर, कुरणखेड व काटेपूर्णा, तसेच बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त पीकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांची सद्यस्थिती याबाबत माहिती घेतली.
यावेळी बोरगाव खुर्द येथीलजिल्हा प रि षदेच्या शाळेला भेट देऊन त्यांनी तेथील सोयी सुवि धांचा आढावा घेतला.
.jpeg)

.jpeg)
%20-%20Copy.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा