‘रोजगार महाकुंभ’ उपक्रम तात्पुरता स्थगित उमेदवार व नियोक्त्यांनी नोंद घेण्याचे आवाहन
‘रोजगार महाकुंभ’ उपक्रम तात्पुरता स्थगित
उमेदवार व नियोक्त्यांनी नोंद घेण्याचे आवाहन
अकोला, दि. २४ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे अकोला जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’हा उपक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल, असे कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी कळविले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा