साखरसाठ्याची मर्यादा आता २ हजार क्विंटलवर

अकोला, दि. १० : केंद्र शासनाच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत 1 ऑगस्टपासून साखरेची साठा मर्यादा लागू झाली. आता साखरसाठ्याची मर्यादा ४ हजारहून २ हजार क्विंटलवर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना २ हजार क्विंटलपर्यंतच साठवणूक करता येईल..
जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे जिल्ह्यात नऊ तपासणी पथके गठित करण्यात आली आहेत. त्याद्वारे वेळोवेळी भेटी, पडताळणी, तपासणी केली जात आहे. तपासणी वेळी साखर व संबंधित व्यावसायीकांनी पथकास सहकार्य करावे व साठ्याबाबत निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व साखर व्यावसायिकांनी अन्नसाठा देखरेख पोर्टलवर https://foodstock.dfpd.gov.in/ साखर व्यावसायिकांनी तात्काळ नोंदणी करावी.
नोंदणी झाल्यावर ताबडतोब त्यांचे व्यवसायाचे ठिकाणी साखर स्टॉक साठा नमूद पोर्टलमध्ये अद्ययावत करावा. त्यानंतर नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी साखर स्टॉक साठा अद्ययावत करावा.
पोर्टलवर चुकीची,अपूर्ण, विलंबित माहिती देणे गंभीर मानून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हयातील सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसारच साखर खरेदी करावी, अनावश्यक साखर साठा खरेदी करून साठवणुक करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन