स्वाधार योजनेच्या अर्जांची त्रुटी पुर्ततेसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत
स्वाधार योजनेच्या अर्जांची त्रुटी पुर्ततेसाठी 10 सप्टेंबरपर्यंत
मुदत
शासकीय
वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी 12
वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा
विद्यार्थ्यांना स्वत्: उपलब्ध करुन
घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा
करण्याकरिता शासनाने भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-2026 या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये आढळलेल्या त्रृटींची पूर्तता करण्याबाबत यापूर्वी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र काही विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत अर्जांतील त्रृटीपूर्तता केलेली नाही.अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाइन पद्धतीने अर्जातील त्रृटींची पूर्तता दि. 10 सप्टेंबर 2026 पर्यंत करुन त्याची प्रिंट ऑॅफलाइन पद्धतीने संबंधित कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त एम.जी.वाठ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा