प्रारूप यादीत समावेश नसलेल्या मतदारांच्या याद्या प्रसिद्ध संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम
अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार मतदार
प्रारूप यादीत समावेश नसलेल्या
मतदारांच्या याद्या प्रसिद्ध
संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन
अकोला, दि. ७ : प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट करता आली नाहीत अशा (अनकलेक्टेबल ईएफ) गटातील मतदारांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, संबंधितांनी
नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने
दि.०१.१०.२०२६ या अर्हता दिनांकावर आधारीत घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या
विशेष सखोल पुनरिक्षणचा (SIR) घोषीत केलेल्या कार्यमातील सुधारीत वेळा पत्रकानुसार प्रारुप यादीची
प्रसिध्दी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी करण्यात आलेली
आहे.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन
गणना प्रपत्र भरुन घेण्याचा कार्यक्रम दिनांक ३० जून ते दिनांक १७ ऑगस्ट या
कालावधीत राबविण्यात आला. या कालावधीत अकोला जिल्हयातील
गणना प्रपत्रे भरून परत न देणा-या २ लक्ष ७६ हजार ९९२ इतके मतदार “गणना प्रपत्र जमा न
होणे (Uncollectable EF)” या प्रवर्गात नोंदविण्यात आलेले आहेत. त्या मतदारांची
नावे ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप
मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय
अधिकाऱ्याने प्रत्यक्ष गृहभेट दिल्यानंतर सापडु न शकलेले /गैरहजर (Absent),
कायमस्वरुपी स्थलांतरीत (Permanently Shifted), मृत (Dead), अन्यत्र नोंदणी केलेले (Already
Enrolled) व इतर (Other) या गटातील
मतदारांचा समावेश आहे.
त्यानुसार जिल्ह्यात आढळून न आलेले/गैरहजर
५१ हजार २६, कायमस्वरुपी स्थलांतरीत १ लक्ष ३४ हजार ५८९, मृत ४६ हजार २४७,
अन्यत्र नोंदणी असलेले किंवा दुबार ४४ हजार ४४८, इतर ६८२ असे दोन लक्ष ७६ हजार ९९२
व्यक्ती आहेत.
ज्यांची नावे प्रारुप मतदार
यादी मध्ये समाविष्ट करता आली नाहीत अशा (अनकलेक्टेबल ईएफ) गटातील मतदारांच्या नावांच्या याद्या उपजिल्हाधिकारी (महसुल)
तथा मतदान नोंदणी अधिकारी,
सर्व उप विभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सर्व तहसिलदार तथा सहायक नोंदणी अधिकारी, जिल्हा
परिषद, अकोला. सर्व पंचायत समिती, महानगरपालिका अकोला. सर्व नगर परिषद, नगर पंचायत या कार्यालयाचे सूचना फलकावर तसेच अकोला जिल्ह्याचे www.akola.gov.in या शासकीय
संकेतस्थळावर विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) या टॅब वर अवलोकनास उपलब्ध करून
देण्यात आलेली आहे. याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा