सेवा संकल्प अभियान प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टुल किटचे वितरण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल खासदार अनुप धोत्रे
सेवा संकल्प अभियान
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टुल किटचे वितरण
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने
वाटचाल
खासदार अनुप धोत्रे
अकोला, दि. १७ : प्रधानमंत्री
विश्वकर्मा योजना पारंपरिक कारागिरांच्या हाताला बळ देणारी व आत्मनिर्भर भारताच्या
दिशेने वाटचाल घडवणारी महत्वपूर्ण योजना आहे, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या
लाभार्थ्यांना टूल किट व प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात झाले.
खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत
खंडेलवाल,
महापौर शारदा खेडकर, जयंत म्हसने, जिल्हाधिकारी
वर्षा मीना, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी
प्राजक्ता खोटरे, विश्वकर्मा
समितीचे सदस्य श्री. अंधारे, श्री. खरप आदी
उपस्थित होते.
योजनेत टूल वितरण, कर्जाची सुविधा, प्रमाणपत्र, ओळखपत्र,
प्रशिक्षण दिले जाते. पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी सुरू
केलेली एक महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे पारंपरिक कौशल्याला प्रोत्साहन मिळून
आर्थिक सक्षमीकरण वाढेल. या उत्पादनांच्या विपणनासाठीही प्रयत्न व्हावेत.जिल्ह्यातील
अधिकाधिक पात्र व्यक्तींना योजनेचा लाभ करून द्यावा, असे आवाहन खासदार श्री. धोत्रे
यांनी केले.
महापौर श्रीमती खेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
योजनेत विविध कौशल्यांचा समावेश आहे. त्यामुळे पारंपरिक कारागिरांना
बळ मिळत आहे, असे जिल्हाधिकारी
श्रीमती मीना यांनी सांगितले.
योजनेच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते
टुल कीट वितरण, प्रमाणपत्र वितरण झाले. टुलकिट प्राप्त कारागीरांनी आनंद व्यक्त केला.
श्रीमती खोटरे यांनी प्रास्ताविक
केले.आकांक्षा गोमासे यांनी सूत्रसंचालन केले.
०००



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा