नागरिकांनी गणेशोत्सवाची नोंदणी बाप्पा डॉट ओआरजी वर करावी - जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

 


नागरिकांनी गणेशोत्सवाची
 नोंदणी बाप्पा डॉट ओआरजी वर करावी

-         जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

#घरोघरीबाप्पा आणि #GharoGhariBappa या हॅशटॅग वापरावा

अकोला,  दि. 15 :  महाराष्ट्रातील घराघरांत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या परंपरा, आठवणी आणि गणपती उत्सवाशी संबंधित कौटुंबिक कथा डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (www.bappa.org) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या घरातील गणेशोत्सवाची परंपरा, माहिती व छायाचित्रांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे यांनी केले आहे.

नोंदणी करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला प्रमाणपत्र

आपल्या गणेशोत्सवाची माहिती यशस्वीरीत्या सादर करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या नावाने अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांनी हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर #घरोघरीबाप्पा आणि #GharoGhariBappa या हॅशटॅगसह शेअर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नोंदणी पूर्णतः मोफत

या उपक्रमातील सहभाग व नोंदणी पूर्णतः मोफत आहे. नागरिकांना +91 91361 72681 या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून किंवा Bappa.org अथवा क्युआर कोडद्वारे या संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. स्थानिक मंडळाव्दारे राबविण्यात येणारे विविध सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने बाप्पा डॉट ओआरजी हे संकेतस्थळ निर्माण केले असून यावर प्रत्येक गणेश मंडळांनी आपली नोंदणी करावी.


नोंदणीची प्रगती जिल्हानिहाय राज्यस्तरीय डॅशबोर्डवर नोंदविण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक कुटुंबांनी आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरा डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन
 जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन