‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित ‘एफडीए’ची कारवाई

 ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित

‘एफडीए’ची कारवाई

अकोला, दि. २ : मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळल्याने घरपोच किराणा व वस्तू पोचविणा-या ‘ब्लिंक कॉमर्स’ या पेढीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी निलंबित केला.

अन्न सुरक्षा अधिकारी र. द्वा. सोळंके यांच्या पथकाने दि. १२ ऑगस्टला या पेढीची तपासणी केली होती व त्रुटी आढळल्यावरून सुधारणेची नोटीस देण्यात आली होती. सुधारणा नोटिशीवर पेढीने २१ ऑगस्टला खुलासा सादर केला. त्यानुसार पेढीची फेरतपासणी करून दि. ३१ ऑगस्टला सुनावणी घेण्यात आली, तसेच त्रुटींची पूर्तता न झाल्याने परवाना निलंबित करण्यात आला.

रॅकव्यवस्थेत अपुरी जागा, प्रमाणापेक्षा जास्त उंची, अयोग्य डिझाईन, खाद्य व अखाद्य पदार्थ एकाच रॅकमध्ये एकत्र साठवणे, अन्न पदार्थांचे खोके व पाकिटे जमीनीवर अस्ताव्यस्त ठेवणे, रॅकखाली मोठ्या प्रमाणात कचरा व धूळ, स्वच्छतेचे वेळापत्रक उपलब्ध नसणे, अन्न हाताळणा-या कामगारांनी हातमोजे, टोपी न वापरणे, खरेदीविक्री देयके व ऑडिट रेकॉर्ड तपासणीसाठी सादर न करणे आदी त्रुटींची पूर्तता न झाल्याने परवाना निलंबित करण्यात आला.

०००

टिप्पण्या