सरपंच पदाच्या आरक्षणाची १० सप्टेंबरला सोडत

 

 

 

सरपंच पदाच्या आरक्षणाची  १० सप्टेंबरला सोडत

अकोला, दि. ७ : अकोला जिल्ह्यातील तालुक्यामध्ये नागरिकांचा  मागास प्रवर्ग व खुला प्रवर्गासाठी सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत १० सप्टेंबरला होणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या १३ जून २०२५, तसेच १२ ऑगस्ट २०२६ च्या अधिसुचनेनुसार निश्चित केलेल्या केवळ नागरिकांच्या मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांच्या आरक्षणामध्ये बदल होत असल्यामुळे शुद्धीपत्रकानुसार ही सोडत होईल.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी ९१ पदे असून त्यापैकी ४८ पदे महिलांकरिता राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६७ पदे सरपंच पदासाठी असून त्यापैकी १२९ पदे महिलांसाठी आहेत.

आरक्षण सोडत प्रक्रिया तेल्हारा, अकोट, पातूर, अकोला येथे तहसील कार्यालयात, बाळापूर येथे नगरपरिषद सभागृहात, मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात शासकीय धान्य गोदाम क्र. ५ येथे, तसेच बार्शिटाकळी येथे पंचायत समिती सभागृहात १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पार पडेल. सर्व संबंधित नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज‍िल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन