सेवा संकल्प अभियानात विविध उपक्रमांना गती ‘समाजकल्याण’तर्फे ज्येष्ठांना ‘वयोश्री’बाबत माहिती; तेल्हा-यात पात्र व्यक्तींना लाभवितरण
सेवा संकल्प अभियानात विविध उपक्रमांना
गती
‘समाजकल्याण’तर्फे ज्येष्ठांना ‘वयोश्री’बाबत
माहिती; तेल्हा-यात पात्र व्यक्तींना लाभवितरण
अकोला, दि. २९ : 'सेवा संकल्प
अभियानात' जिल्ह्यात विविध उपक्रमांना गती मिळाली आहे. विविध योजनांविषयी जनजागृतीबरोबरच
पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरणाच्या कार्यक्रमांनाही वेग आला आहे.
तेल्हारा तहसील कार्यालयात
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या विविध
योजनांमधील लाभार्थ्यांच्या अडचणी जागेवरच सोडवून २९ पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली आणि त्यांना आज मंजुरी आदेशांचे थेट वाटप
करण्यात आले.
तहसीलदार महेश रामगुंडे व इतर अधिकारी उपस्थित
होते. या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय
वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यांसारख्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध
योजनांच्या लाभार्थ्यांनी हजेरी लावली होती. शासकीय कागदपत्रांमधील त्रुटी किंवा
इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी
केली. सर्व त्रुटी दूर करून २९ पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली.
वयोश्री योजनेबाबत मार्गदर्शन
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे सांस्कृतिक सभागृह येथे मुख्यमंत्री
वयोश्री योजना योजना व मुख्यमंत्री तीर्थ
दर्शन योजना अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना योजनेची माहिती देण्यात आली. समाजकल्याण
सहायक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.
पात्र लाभार्थी यांनी लाभाच्या स्वरूपात त्यांनी ज्या वस्तू खरेदी केल्या
त्याच्या पोचपावत्या घेण्यात आल्या, तसेच योजनेबद्दल सखोल
माहिती देण्यात आली.
सेवा संकल्प अभियान व सेवा माझे योगदान या उपक्रमांतर्गत विविध
तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती योजना स्वाधार योजना
याबाबतीत ऑनलाइन असलेल्या प्रलंबित अर्जाच्या त्रुटींची पूर्तता करून घेण्यात
आली.
उपस्थितांना योजनेची सखोल
माहिती सांगण्यात आली. तसेच ऑनलाईन योजनेचा फॉर्म कसा
भरण्यात यावा याबाबत सर्व समता दूतामार्फत समन्वय साधून अर्ज प्रलंबित अर्ज निकाली
काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
पातूर तालुक्यातील मौजे शिर्ला
येथे भटके विमुक्त जाती बाबत विशेष शिबिर घेण्यात आले.
०००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा