शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान ; महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची दिली माहिती ; जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान
महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची दिली माहिती
जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
अकोला दि 20 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील डाबकी रोड येथील समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
याप्रसंगी महिला बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे नितीन अहिर, बाल कल्याण समितीच्या सदस्य प्रांजली जयस्वाल, वन स्टॉप सेंटरच्या ॲड.मनीषा भोरे, रेल्वे चाइल्ड लाईनचे पद्माकर सदांशिव, स्वप्नील शिरसाट, चाइल्ड हेल्प लाईनचे रोहित भाकरे, वैभव भदे, समाजसेवा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश काळे, विनायक अनासने, मनोज देशमुख,अभय कुलकर्णी,राम मंगळे आदी यावेळी उपस्थित होते.
महिला बालविकास विभागाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन अहिर यांनी
महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजना, बाल संगोपन योजना, प्रतिपालकत्व योजना याबाबत माहिती दिली..
प्रत्येक बालकाला सुरक्षित व बालस्नेही वातावरण प्रदान करणे सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन
बाल कल्याण समिती सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी यावेळी केले.
सखी वन स्टॉप सेंटर जिल्हा स्त्री रुग्णालयात कार्यरत असून त्या अंतर्गत हिंसा, अत्याचार किंवा संकटात सापडलेल्या महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेविषयक, पोलीस आणि मनोवैज्ञानिक मदत देणारी शासकीय योजना आहे. महिला हेल्पलाइन 181 आदी महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती तज्ञ अधिकारी वर्गांकडून देण्यात देण्यात आली.
यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील भक्तगण महिला , पुरुष, शाळकरी मुले, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहे. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकसंवाद२०२६ या उपक्रमातून जिल्ह्यात गणेश मंडळाच्या ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहितीपर व्याख्याने आणि प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेली आहे.
०००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा