पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन कावड पालखी उत्सवात सहभाग

 










पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी

घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन 

कावड पालखी उत्सवात सहभाग

अकोला, दि ७ :राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज श्रावण सोमवारी श्री राजराजेश्वर कावड पालखी उत्सवानिमित्त अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वराचे दर्शन घेतले व जलाभिषेक केला.

यावेळी त्यांनी कावड पालखी उत्सवात उपस्थित राहून मानाच्या श्री  राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या मानाच्या पालखीचे स्वागत केले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अनेक मान्यवर, कावड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर यांच्या जलाभिषेकाचा सोहळा अत्यंत ऐतिहासिक असून यामध्ये संस्कृती, धर्म, विश्वास, भक्ती आणि मानवता यांचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळतो. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ४८ तास अखंड चालणारा हा कावड जलाभिषेक सोहळा असतो.  

पालकमंत्र्यांनी श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शन घेऊन जलाभिषेक केला. यावेळी त्यांनी संस्थानच्या कार्यालयालाही भेट दिली. संस्थान समितीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जैन चौकातील स्वागतस्थळी उपस्थित राहून त्यांनी शाही स्वारी – मानाच्या पालखीचे स्वागत करत दर्शन घेतले.

  ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन