जिल्ह्यात २२ संस्था अंतिम अवसायनात अवसायकांची २२ सप्टेंबरला सभा

  

जिल्ह्यात २२ संस्था अंतिम अवसायनात

अवसायकांची २२ सप्टेंबरला सभा

अकोला, दि. ७ : अकोला तालुक्यातील २२ सहकारी संस्था अंतिम अवसायनातील संस्थांच्या अवसायकांची सभा दि. २२ सप्टेंबर सकाळी ११ वा. सहकारी संस्था उपनिबंधकांच्या कार्यालयात होईल.

 

संस्थांमध्ये अकोला मेन हॉस्पिटल कर्मचारी पतसंस्था, जनता होलसेल अँड कन्झुमर्स कर्मचारी सह. पतसंस्था, कामगार राज्य विमा दवाखाना कर्म. सह. पतसंस्था, प्रभात कर्मचारी सह. पतसंस्था, एमआयएल कर्मचारी सहकारी पतसंस्था, नवभारत कन्झ्युमर्स सोसायटी, एमएसईबी वर्कर्स हाऊसिंग सोसा., अकोलारत्न गृहतारण संस्था, विठ्ठल गृहतारण सह. संस्था, सौरभ गाळेधारक गृहनि. संस्था, संत गाडगेबाबा म्हाडा गृहनि. सह. संस्था, संत संताजी गृहनि. सह. संस्था, राधिका गृहतारण सह संस्था, गुरूकृपा गृहनि. सह. संस्था, सहकार खाते शासकीय गृहनि. सह. संस्था, सहकार रत्न गृहतारण सह. संस्था, अकोला प्रवासी व मालवाहतूक सह. संस्था, वसुंधरा सुशिक्षित बेरोजगार सेवा सह. संस्था, लोकसेवक सु. बे. सेवा सह. संस्था, निर्मल नंदा सु. बे. सेवा संस्था, श्री राजराजेश्वर स्वयंरोजगार नागरिक सेवा सह. संस्था, कॉटनसिटी क्रेडिट को-ऑप सोसायटी आदी संस्थांचा समावेश आहे.

संबंधितांनी दि. २२ सप्टेंबरला सकाळी ११ वा. उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका अकोला, जिल्हा सहकारी भूविकास बँक, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अकोला येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन