शासकीय आश्रमशाळेत शिक्षक भरती उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आदिवासी विकास विभागाकडून वेळापत्रक जाहीर; शिक्षण आयुक्तालयाकडून यादी प्राप्त

 

 

शासकीय आश्रमशाळेत शिक्षक भरती

                        उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु

आदिवासी विकास विभागाकडून वेळापत्रक जाहीर; शिक्षण आयुक्तालयाकडून यादी प्राप्त

अकोला, दि. ३ : शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यासंदर्भातील सविस्तर जाहीर सूचना व वेळापत्रक अमरावती अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण पडताळणी प्रक्रिया शनिवार (दि.५) पर्यंत पार पडणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्याहजार ४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीशिवाय निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक- ९२७, माध्यमिक शिक्षक- ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक-  २५२ अशा एकूण १६०० उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यात  पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील ११४१ उमेदवारांचा समावेश आहे.

संबधित उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात सर्वाधिक पात्र ५८८ उमेदवार असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६उमेदवार तर अमरावती विभागात २९२ उमेदवार आहे. 

संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार लागणारी कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (self-attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. निर्धारित केलेल्या दिनांक व वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला वेळोवेळी भेट  देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया

शासकीय आश्रमशाळांमधील आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे.

-लीना बनसोड, आयुक्त

आदिवासी विकास विभाग

चौकट

संवर्गनिहाय पदसंख्या

पेसा : प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम- १९६,  प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम-१६, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम- ९४, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम- ०२, उच्च माध्यमिक शिक्षक - १५१

नॉनपेसा : प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम- ५९३, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम- १२२, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम- ३०२, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम- २३, उच्च माध्यमिक शिक्षक- १०१

------------ ---------------- -------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन