मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुसुत्रीकरणानंतर जिल्ह्यात १ हजार ७४० मतदान केंद्रे; यादी प्रसिध्‍द

 

 

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम

सुसुत्रीकरणानंतर जिल्ह्यात हजार ७४० मतदान केंद्रे; यादी प्रसिध्‍द

 

 

                अकोला, दि. 3 : भारत निवडणूक आयोगाने दि.०१.१०.२०२६ या अर्हता दिनांकावर आधारीत घोषित केलेल्‍या मतदार याद्यांच्‍या विशेष सखोल  पुनरिक्षण कार्यक्रमामध्‍ये मतदान केंद्राच्‍या सुसूत्रीकरण कार्यक्रमाचाही समावेश होता. मतदान केंद्रांच्‍या सुसुत्रिकरणानंतर जिल्‍हयात एकूण १ हजार ७४० मतदान केंद्रे आहेत.

अकोला जिल्‍हयाच्‍या मतदान केंद्राच्‍या सुसूत्रीकरण प्रस्‍तावास मा. भारत निवडणूक आयोगाने मान्‍यता प्रदान केलेली आहे. त्‍यानुसार अकोला जिल्‍हयात ३२-मुर्तिजापूर (अजा) विधानसभा मतदार संघातील शेलु बाजार येथील मतदार संख्‍येचा विचार करता एकाच इमारतीमध्‍ये असलेल्‍या दोन मतदान केंद्रापैकी मतदान केंद्र क्रमांक २१ हे मतदान केंद्र क्रमांक २० मध्ये पूर्णपणे समाविष्ठ करण्यात आले आहे.

याव्‍यतिरीक्‍त जिल्‍हयातील मतदान केंद्रामध्‍ये कोणताही बदल नाही व कोणतेही नविन मतदान केंद्र तयार होत नाही. याबाबत दिनांक १७ ऑगस्टला जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक घेऊन अवगत करण्‍यात आले होते. वरील प्रमाणे जिल्‍हयातील ३२-मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील १ मतदान केंद्र कमी होत असल्‍यामुळे मतदान केंद्रांच्‍या सुसुत्रिकरणानंतर जिल्‍हयात एकूण १७४० मतदान केंद्र असणार आहेत. त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

एकूण

२८-अकोट विधानसभा मतदार संघ

३४६

२९-बाळापूर विधानसभा मतदार संघ

३४७

३०-अकोला(पश्चिम)विधानसभा मतदार संघ

३०७

३१-अकोला(पूर्व)विधानसभा मतदार संघ

३५१

३२-मुर्तिजापूर(अजा) विधानसभा मतदार संघ

३८९

ए‍कूण मतदार केंद्र

१७४०

     

        वरिल प्रमाणे अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील एकूण १७४० मतदान केंद्रांची यादी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाययक नोंदीणी अधिकारी, जिल्‍हा परिषद, अकोला व त्‍याअंतर्गत पंचायत समिती,  अकोला महानगर पालीका, नगर परिषद, नगर पंचायत या कार्यालयाचे सूचना फलकावर तसेच अकोला जिल्ह्याचे www.akola.gov.in या शासकीय संकेतस्थळावर विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) या टॅब वर अवलोकनास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत सर्वांनी नोंद घ्‍यावी व मतदान केंद्राचे अद्यावत यादीचे अवलोकन करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन