गणेशोत्सव शांतता, उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा -जिल्हाधिकारी वर्षा मीना ; सुलभ परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजना

 गणेशोत्सव शांतता, उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा

-जिल्हाधिकारी वर्षा मीना

सुलभ परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजना  

 

अकोला, दि. -  आगामी गणेशोत्सवात सर्व स्तरातील समाज घटकांनी सौहार्दपणे सहभागी होऊन शांतता व उत्साहाच्या वातावरणात व पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. तसेच या उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करावी, असे निर्देशही त्यांनी महापालिका व पोलीस यंत्रणांना  दिले.

 

आगामी गणेशोत्सवासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात बैठक पार पडली. या बैठकीस आमदार वसंत खंडेलवाल, आमदार साजिदखान पठाण, ॲड. मोतीसिंग मोहता, पोलीस अधिक्षक र्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, अपर पोलीस अधिक्षक चंद्रशेखर रेड्डी, सिध्दार्थ शर्मा,  धर्मादाय आयुक्त श्री. चौधरी, तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

 

जिल्ह्यात 14 सप्टेंबर पासून ते 25 सप्टेंबर  या कालावधीत श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सु व्यवस्था अबाधित राखून विसर्जन व मिरवणूकीदरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यावयाच्या आहेत. या नुषंगाने आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाबाबत सविस्तर चर्चा बैठकीत झाली.

 

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जिल्ह्यात नोंदणीनुसार सुमारे 1 हजार 984 मोठे व लहान गणेश मंडळे आहे. उत्सव काळात कायदे व सुव्यवस्था राखतानाच भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात. महापालिका प्रशासनाने मिरवणूक व विसर्जन विनाअडथळा होण्याच्या दृष्टीने रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे कार्य प्राधान्याने  पूर्ण करावे. तसेच पथदिव्यांची दुरुस्ती करुन घ्यावी.

गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या सुलभरित्या प्राप्त होण्यासाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबवावी. त्यासाठी संबंधि विभागांनी एक नोडल अधिकारी, कर्मचारी  नियुक्त करावेत.‍  विद्युत विभागाने सुध्दा लोंबकळलेल्या  वीजतारा सुरळीत कराव्यात, तसेच गणेश मंडळाना गणेशोत्सव कालावधीत वीज पुरवठा सुरळीतरित्या मिळण्यासाठीची परवानगी द्यावी.

गणेशमूर्ती विक्रीचे नियोजन, गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक मार्ग रहदारी व्यवस्थापन, गणेश मूर्ती उंची, उच्च ध्वनी मर्यादा पालन याबाबत काटेकोरपालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

मंडळांनी  ध्वनीमर्यादेचे कटाक्षाने पालन करावे. पारंपरिक वाद्यांचा वापर व्हावा. स्थापना ते विसर्जन या कालावधीत गणेश मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी पोलीस विभाग सज्ज व दक्ष आहे, असे पोलीस अधीक्षक श्री. चांडक यांनी सांगितले. गणेशोत्सव शांतता व सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावा व त्यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 महानगरपालिकेतर्फे घरगुती गणेश विसर्जनासाठी चार ठिकाणी घाटांची निर्मिती केली जाईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे कार्य लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच पथदिव्यांची दुरुस्तीही करण्यात येईल. गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या सुलभरित्या प्राप्त होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे.श्री गणेश मिरवणूक व विसर्जनाच्या कालावधीत शहरात गणेश विसर्जनासाठी मोठे टँक तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी 4 फुटापर्यंत गणपतींचे विसर्जन करता येईल. तसेच मोठ्या मूर्तीविसर्जनाची सुविधा बाळापूर येथील नदी घाटावर असेल, अशी माहि ती त्यांनी यावेळी दि ली.


000000











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन