जिल्हाधिका-यांकडून दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी

 





जिल्हाधिका-यांकडून दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी

‘मनरेगा’मध्ये अधिकाधिक कामे राबवा

-        जिल्हाधिकारी वर्षा मीना

जिल्ह्यात सर्वत्र पंचनामे सुरू; वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

अकोला, दि. ३० : जिल्ह्यातील शेतांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून घ्यावेत. ‘मनरेगा’च्या माध्यमातून शेतरस्ते, विहीरी आदी कामे राबवून ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगारनिर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी आज येवता, येळवण, कानशिवणी येथे भेट देऊन दुष्काळी परिस्थितीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार कुणाल झाल्टे, प्र. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुषार जाधव, कृषी उपसंचालक हरिश देशमुख आदी उपस्थित होते.

कपाशी, सोयाबीन व संत्रा पीक उत्पादकांच्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिका-यांनी नुकसानाचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्या म्हणाल्या, शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी सविस्तर व तपशीलवार पंचनामे करावेत. दुष्काळी स्थितीमुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक नुकसानाची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

शेतकरी बांधवांचे म्हणणे संवेदनशीलतेने जाणून घेऊन त्यांना अधिकाधिक मदत मिळेल, असे प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे,  या परिस्थितीत ग्रामीण भागात मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे राबवून मोठी रोजगारनिर्मिती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिका-यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. येवता येथील शे. रशीद शे. इस्माईल यांच्या व दीपक भोयर यांच्या शेतात सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली. येळवण येथील गुलाबराव ठाकरे यांच्या शेतात सोयाबीन व तूर पीक नुकसानाची पाहणी, तसेच कानशिवणी येथे यशवंत खोब्रागडे यांच्या शेतात कापूस व सुनीता मेश्राम यांच्या शेतात सोयाबीन नुकसानीची पाहणी केली.

येळवण येथील गजानन पंडागे, गोपाळराव वाघमारे, नंदकिशोर वाघमारे यांच्या शेतीला भेट देऊन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मनरेगा फळबाग लागवड, एचडीपीई पाईप व स्प्रिंकलर संच पाहणी, पोकराअंतर्गत सामूहिक शेततळे आदी कामांची पाहणी करण्यात आली. कानशिवणी येथे ई-पीक पाहणीअंतर्गत प्रत्यक्ष शेतावर पडताळणी करण्यात आली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा