सेवा संकल्प अभियानात मानवी रांगोळी दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग



 सेवा संकल्प अभियानात मानवी रांगोळी

दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

अकोला, दि. १७ : सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ अकोला येथे झाला असून, लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात मानवी रांगोळी साकारण्यात आली. त्यात शहरातील विविध शाळांचे दीड हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर  या कालावधीत जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आरडीसी गजेंद्र मालठाणे यांच्या नियोजनात विविध उपक्रमांनी अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ आज झाला.

जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा शिक्षण विभागाच्या सहकार्याने लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर विद्यार्थ्यांच्या सहभागासह महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला. त्यासमोर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ असे रेखाटलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महापालिकेच्या शाळांचे दीड हजारहून अधिक विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले. भारतमातेचा जयघोष, मुलांचा उत्साह, जल्लोषाने आसमंत निनादून गेले होते. 

जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, महापालिकेचे शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र ईटनकर, जिल्हा वॉर रूमचे समन्वयक ऋषिकेश आग्रे, मुख्याध्यापक राजू भिरड, मो. अजिज मो. अन्वर, गजेंद्र ढवळे, सुरेंद्र शिंदे,नीलेश सोळंके, मो. साकिब, मो. इरफान रहमान, मो. हाफिज उल्लाह बेग आदी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन