सेवा संकल्प अभियान अनाथांना प्रमाणपत्रांचे वितरण



 

 

 

सेवा संकल्प अभियान

अनाथांना प्रमाणपत्रांचे वितरण

अकोला, दि. १७ : सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सहकार्याने अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण आज झाले.  

जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, सुनील लाडुलकर यांच्यासह बाल कल्याण समितीच्या सदस्य प्रांजली जैस्वाल, सचिन घाटे, सुनील सरकटे, वैभव भदे, राजेश मनवर तसेच  राजेश देशमुख  आदी यावेळी उपस्थित होते.

 अनाथ बालकांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के समांतर आरक्षणाचा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण केले जाते. सेवा संकल्प अभियानात गरजूंपर्यंत पोहोचून आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे, असे ॲड. गुरव यांनी सांगितले. श्री. पवार यांनी सेवा संकल्प अभियानातील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतीश राठोड यांनी केले.

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत अनाथ बालकांना त्यांचे हक्क, शासकीय सवलती व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन