महाप्रसाद व भोजनासाठी केवळ 'व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर' बंधनकारक

 महाप्रसाद व भोजनासाठी केवळ 'व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर' बंधनकारक

अकोला, दि. २१ ; आगामी गणेशोत्सवात व येणाऱ्या सर्व सार्वजनिक उत्सवात विविध सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे किंवा अन्य मंडळाद्वारे भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद व भोजनाचे आयोजन केले जाते. या प्रसादाची निर्मिती करतांना अनेक मंडळे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतात. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व धोकादायक आहे. गॅस प्रेशरमधील फरक व अपघाताचा धोका घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या बर्नर आणि गॅस प्रेशरमध्ये मोठा फरक असतो. मोठ्या क्षमतेची भांडी व भडारखान्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरल्यास भीषण अपघात घडून मोठी जीवित व वित्तहानी होवू शकते.
गणेश भक्तांच्या सुरक्षा, संभाव्य अपघात टाळणे आणि कायद्याचे पालन होणे आवश्यक आहे. या जिल्हयातील सर्व तालुक्यात सार्वजनिक गणेश मंडळ व अन्य सार्वजनिक मंडळांना, संस्थांना मंडप, ध्वनी किंवा महाप्रसादाची परवानगी देतांना, महाप्रसादासाठी केवळ व्यावसायिक सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक राहील. या जिल्हयातील सर्व गॅस एजन्सी वितरकांनी सार्वजनिक गणेश मंडळे, संस्था किंवा महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच पुरवठा करण्याबाबत या जिल्हयातील सर्व गॅस एजन्सी वितरक/परवानाधारक, यांना याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. घरगुती गॅसचा वापर होतांना आढळून आल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये फौजदारी गुन्हा नोद करण्यात येईल.
या कार्यालयाद्वारे सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिनांक 12/09/2026 रोजीचे आदेशान्वये तपासणी /भेटी करण्यासंदर्भात कळविण्यात आलेले आहे.
याद्वारे सर्व गणेश मंडळ, अन्य सार्वजनिक मंडळ,, संस्थांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महाप्रसाद व भोजनाचे कामामध्ये व्यावसायीक गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन