राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ९ सप्टेंबरला अकोल्यात

 

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ९ सप्टेंबरला अकोल्यात 

अकोला, दि. : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा दि. ९ सप्टेंबर  रोजी अकोला येथे दौरा असून, बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बाल संरक्षण व्यवस्थेची अंमलबजावणी तसेच बालगृहातील बालकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

 

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास भवनात सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत बाल हक्कांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२.३० ते २  वा.पर्यंत अकोला जिल्ह्यातील बालसंरक्षण विषयक कामकाजाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकी जिल्ह्यातील बाल संरक्षणाशी संबंधित विविध बाबी, प्रलंबित प्रकरणे, बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच संबंधित यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.

 

त्याचप्रमाणे, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वा. दरम्यान आयोगाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील बालगृहांना भेट देण्यात येणार आहे. या भेटीदरम्यान बालगृहातील बालकांच्या निवास, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आहार, समुपदेशन व पुनर्वसनाच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार असून बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन