बाळापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी अर्ज आमंत्रित
बाळापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी अर्ज आमंत्रित
अकोला, दि. ७ : आर्यभट्ट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर येथील सोलार टेक्निशियन शिल्पनिदेशकच्या एका पदासाठी ११ महिन्यांकरिता एकत्रित मानधनावर करार तत्वावर पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुकांनी संपूर्ण कागदपत्रासह आपले अर्ज १९ सप्टेंबरपर्यंत संस्थेला हस्तपोच करावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता बाळापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहावे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा तसेच एक वर्षाचा अनुभव किंवा आयटीआय / सीआयटीएस प्रमाणपत्रधारक सोलार टेक्निशियन ट्रेड व तीन वर्षाचा अनुभव याप्रमाणे असावी. तसेच यासोबत सीआयटीएस / क्राफ्ट इन्सट्रक्टर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रे व रुपये 200 शुल्कासह उपरोक्त नमूद तारखेस मुलाखतीसाठी संस्थेत हजर राहावे, असे आवाहन बाळापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे करण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा