'लोकसंवाद' अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर आरोग्य विभागाकडून वैद्यकीय उपचार व सेवा विषयक योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

 






'लोकसंवाद' अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर


आरोग्य विभागाकडून वैद्यकीय उपचार व सेवा विषयक योजनांची माहिती

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
 


अकोला, दि. २२ :  सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम, वैद्यकीय उपचार सुविधा आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया तर्फे लोकसंवाद- २०२६ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच श्री गणेशा आरोग्याचा या दोन्ही उपक्रमांतर्गत अकोला शहरातील जठारपेठ चौकातील स्वराज्य गणेशोत्सव मंडळापुढे स्त्रीरोग तज्ञ डॉ. शीतल गावंडे यांच्याव्दारे आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाव्दारे वैद्यकीय मदत आदी आरोग्य विषयक योजनांविषयी माहिती नागरिकांना देण्यात आली.

गणेश उत्सवाच्या औचित्य प्रसंगी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून राज्यभरात दि १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान लोकसंवादाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
 
केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून बीपीएल, एपीएल केशरी कार्डधारकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार सुविधा दिली जाते. आयुष्यमान कार्ड कुठल्याही सेवा सेतू केंद्रातून बी आय एस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून प्राप्त करून घेता येते. यासाठी प्रथम घरातील सर्व सदस्यांची ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. अकोला शहरातील 82 रुग्णालये या योजनेत अंतर्भूत आहेत. जिल्ह्यातील सुमारे 17 लाख 33 हजार लाभार्थ्यांपैकी 70 टक्के लोकांनी आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व गोरगरीब गरजू व पात्र नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी करावी, असे आवाहन डॉक्टर गावंडे यांनी यावेळी केले. राज्य शासनाच्या वैद्यकीय सेवा सुविधांच्या योजना संदर्भात अधिक माहितीसाठी शासकीय रुग्णालय, महापालिका रुग्णालय नगरपरिषद रुग्णालय, आरोग्य सेवक, आशा सेविका आदिशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. गावंडे यांनी यावेळी केले

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचार व सेवा सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे जिल्हा परिषदेचे माध्यम समन्वयक श्री. घुगे यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सव काळात गणेश मंडळांच्या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधणे शक्य होत आहे. हाच धागा पकडून जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-२०२६’ च्या माध्यमातून ही माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम हाती घेतला आहे.


या कार्यक्रमाप्रसंगी माहिती अधिकारी विजय राऊत यांनी लोकसंवाद 2026 या उपक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी स्वराज्य गणेशोत्सव मंडळाचे प्रशांत पाटील नगरसेवक गिरीश गोखले यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य पदाधिकारी भक्तगण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन