विशेष लेख : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शिक्षण,रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना
महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास वर्गीय घटकांसाठी शिक्षण, रोजगार स्वयंरोगारासाठी सहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती करुन देणारा हा लेखः स्थापना महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून 23 एप्रिल 1999 रोजी कंपनी अधिनियम 1956 अन्वये महामंडळाची स्थापना करण्यात आली तसेच नोंदणी कंपनी कायद्यान्वये नोंदणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आथिक विकास महामंडळाची स्थापना 18 जून 2010 रोजी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली. उद्दिष्ट राज्यातील इतर मागासवर्गियांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास , पणन , संस्करण , कृषी उत्पादनांचा पुरवठा आणि साठवण , लघुउद्योग , इमारत बांधणी , परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्य व्यवसाय (वैद्यकीय , अभियांत्रिकी , वास्तुशास्त्रीय) व्यापार किंवा उद्योग यांची योजना आखणे , त्यांना चालना देणे , सहाय्य करणे , सल्ला देणे , मदत करणे , वित्त पुरवठा ...