"सेवा संकल्प अभियान" महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती


 

  "सेवा संकल्प अभियान" महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती

अकोला दि. 01 -"सेवा संकल्प अभियान" अंतर्गत आज मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये समाज कल्याण, महिला बाल कल्याण विभागाव्दारे अकोला महानगरपालिका अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाच्या  पदाधिकारी व सदस्यासांठी अकोला मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ.किर्ती देशमुख, मनपा देशमुख फैल नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ.निलिमा कोल्हे तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सपना लांडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या. 

यावेळी मार्गदर्शकांनी महिलांना आपल्या दैनंदिन जीवनातल्या कामामुळे परिवरातील तणावामुळे आपले स्वत:चे संरक्षण व आरोग्याशी निगळीत असलेल्या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले तसेच महिलांनी नियमीत आरोग्य तपासणी करणे, मासिक पाळीच्या काळात स्वच्छातेची विशेष काळजी घ्यावी व यावेळेमध्ये हायजीनची काळजी घेणे, किशोरवयीन मुलींनी पोषण व आरोग्यकडे विशेष लक्ष देणे, किशोरवयीन मुलींनी एच.पी.व्ही. लसीकरण करणे, याचसोबत मशरूम, सोया पनीर, सोयामिल्क, प्रोजोन फूड याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

            यावेळी समाज कल्याण अधिकारी रंजना घुले, मंगेश शिरसाट, माया ठाकुर, पुष्पा तिवारी, पवन सोळंके, मनपा अधिनस्त अलेल्या समुदाय संघटिका संगीता पाठक, वैशाली काळे, दिपाली महल्ले, नीता वाकोडे, सोनटक्के, यांचेसह महिला बचत, शहर स्तर संघ, वस्ती स्तर संघ च्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा