मतदार यादीतील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ १७, १८, २४ व २५ ऑक्टोबरला विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला

 

मतदार यादीतील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

१७, १८, २४ व २५ ऑक्टोबरला विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला

अकोला : भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती सादर करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून पात्र नागरिक व नवमतदार वंचित राहू नयेत, तसेच अधिकाधिक नागरिकांना या संधीचा लाभ घेता यावा, यासाठी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ या दिवशी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी होणार आहेत.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना मतदार यादीतील नोंदींबाबत दावे व हरकती सादर करता येतील. भारत निवडणूक आयोगाने यापूर्वी जारी केलेल्या सूचना सुधारित वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष नोंदणी शिबिरांनाही लागू राहतील.

पात्र नागरिकांनी, विशेषतः नवमतदारांनी, आपल्या नावाची मतदार यादीतील नोंद तपासून आवश्यकतेनुसार नावनोंदणी तसेच दावे व हरकतींसाठी निर्धारित मुदतीत कार्यवाही करावी. विशेष नोंदणी शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे :

 - दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत : २६ ऑक्टोबर २०२६

 - विशेष नोंदणी शिबिरे : १७, १८, २४ व २५ ऑक्टोबर २०२६

 - अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : १६ नोव्हेंबर २०२६

0000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा